
नागपूर -शांतिनगर परिसरात ६६ वर्षीय फळ विक्रेत्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी रस्त्यात अडवून लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात वृद्धाच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
ही घटना १५ ऑगस्टच्या रात्री सुमारे १० वाजता दलालपुरा चौकातील झोपडा हॉटेलजवळ घडली. शेख मुन्ना शेख सिकंदर हे दलालपुरा परिसरात राहतात आणि फळ विक्रीचा व्यवसाय करतात.
मुन्ना शेख हे घटनास्थळावरून पायी जात असताना जम्मू शेख सिकंदर आणि सैफअली अख्तर अली अख्तर उर्फ शेखू या दोघांनी त्यांना अडवले. येता-जाता आपली बदनामी का करता, असा जाब विचारत आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर जम्मू शेख सिकंदर याने लाकडी दांड्याने मुन्ना शेख यांच्या डाव्या पायावर वार केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुन्ना शेख यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर त्यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी शांतिनगर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून जम्मू शेख सिकंदर याला अटक केली आहे. त्याचा साथीदार सैफअली अख्तर याचा शोध सुरू असून, पुढील तपास शांतिनगर पोलीस करत आहेत.
The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%