Skip to content
Live newsroom
Monday, August 17, 2026 Live Sync: Just now
Business and future technology newspaper
Business. Innovation. Tomorrow.
BreakingProcessional Canopies: History, Tradition and Evolution
Important

यशोधरानगरमध्ये २८ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर -अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच आहे. यशोधरानगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एमडीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून २८ ग्रॅम एमडी, दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना बीट मार्शलला ऑटोमोटिव्ह चौकाजवळ काही जण […]

By deepak · August 17, 2026 · 1 min read

Auto Draft

नागपूर -अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच आहे. यशोधरानगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एमडीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून २८ ग्रॅम एमडी, दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना बीट मार्शलला ऑटोमोटिव्ह चौकाजवळ काही जण एमडीची तस्करी करण्याच्या उद्देशाने थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात घेराव घालत कारवाई केली. यावेळी ऋतिक उपवंशी, पियूष वाघ आणि देवांग सुनारे या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून २८ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली. यासोबतच एक दुचाकी आणि मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे सव्वा तीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आरोपींनी एमडी कुठून आणली आणि ती पुढे कोणाला विक्री करण्यासाठी नेण्यात येत होती, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%

Source: Read the original article on www.nagpurtoday.in